
हालेवाडीत सेवा संस्था निवडणूकीत चुरस
हालेवाडीच्या संस्था
निवडणुकीत चुरस
उत्तूर, ता. ४ ः हालेवाडी (ता. आजरा) येथील भैरीदेव विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात विभागणी झाली आहे. संवेदनशील म्हणून पोलिस खात्यात नोंद असलेल्या या निवडणुकीकडे आजरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
केडीसीसी बँकेच्या ठरावावरून गावातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक गट अशोक चराटी यांचे समवेत, तर दुसरा गट सुधीर देसाई यांच्याकडे गेला.
११ मे रोजी सेवा संस्थेसाठी मतदान आहे. राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व इतर यांची महाआघाडी येथे भैरीदेव शेतकरी महाविकास आघाडी करून रिंगणात आहे. या आघाडीकडून किरण विष्णू आजगेकर, रामचंद्र गोविंद खवरे, विनायक सखाराम पाटील, शामराव विष्णू पाटील, शालन पुंडलिक पाटील, अनिल बंडू बेलकर, वसंत आबा येजरे, प्रकाश मारुती सासूलकर, वनिता संजय येजरे, संगीता रामदास येजरे, गणपती गुंडू कांबळे, मधुकर बाळकू जाधव, जिवबा बाळकू लोहार निवडणूक लढवत आहेत.
भैरीदेव ग्रामविकास आघाडीकडून आण्णापा लक्ष्मण आपके, बंडू मारुती पन्हाळकर, प्रभाकर वाकोजी पाटील, भीमराव सिद्धू पाटील, विश्वनाथ मारुती पाटील, सूरज बाबूराव पाटील, बाळकृष्ण केशव येजरे, अतुल तुकाराम येसादे, कमल रवींद्र खोराटे, मालूबाई बाळकृष्ण पाटील, दशरथ जानबा कांबळे, प्रसाद अनिल सुतार, अरुण गणपती पाथरवट हे निवडणूक लढवत आहेत.
--------------
चौकट
दोन्ही गटांकडून प्रतिष्ठापनाला
ग्रामपंचायत निवडणूक, भैरीदेव मंदिर बांधकाम, केडीसीसी ठराव, सर्वोदय पतसंस्था निवडणूक यांचे संदर्भ सेवा संस्थेच्या निवडणकुीत चर्चेत आहेत. यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांकडून प्रतिष्ठेची बनवली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02009 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..