मतदारांना आणताना चिमणेत बाचाबाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारांना आणताना चिमणेत बाचाबाची
मतदारांना आणताना चिमणेत बाचाबाची

मतदारांना आणताना चिमणेत बाचाबाची

sakal_logo
By

मतदारांना आणताना
चिमणेत बाचाबाची
सेवासंस्था निवडणूक; सत्तारूढ आघाडी विजयी
उत्तूर, ता. २२ : चिमणे (ता. आजरा) येथील भावेश्‍वरी सेवासंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परगावचे मतदार मतदानासाठी आणताना किरकोळ बाचाबाची झाली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. गावात रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, निवडणुकीत सत्तारूढ श्री भावेश्वरी ग्रामविकास पॅनेल आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. ६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सभासदवाढ करणे व बाहेरगावचे सभासद करण्यावरून उच्च न्यायालयापर्यंत विरोधकांनी हरकती दाखल केल्या होत्या. न्यायालयाने हरकती फेटाळल्या, तेव्हापासून चिमणेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. सकाळपासून गावात शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास परगावचे मतदार मतदानासाठी येत असताना वादावादी झाली. परिस्थिती चिखळू नये म्हणून आजरा, गडहिंग्लज येथून जादा कुमक आली. पोलिस बंदोबस्तात मतदान झाले. लक्ष्मण अस्वले, रमेश चव्हाण, तानाजी तवंदकर, आनंदा तारळेकर, महादेव नादवडेकर, राजाराम पाटील, शिवाजी शिवणे, बाळू सलपे, शोभा चव्हाण, वंदना येसादे, दिनकर कांबळे, संभाजी तांबेकर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02037 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top