मोफत तिरंगा ध्वज देण्याचा हालेवाडीमध्ये निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत तिरंगा ध्वज देण्याचा हालेवाडीमध्ये निर्णय
मोफत तिरंगा ध्वज देण्याचा हालेवाडीमध्ये निर्णय

मोफत तिरंगा ध्वज देण्याचा हालेवाडीमध्ये निर्णय

sakal_logo
By

तिरंगा ध्वज मोफत देण्याचा
हालेवाडीतील संस्थेचा निर्णय
उत्तूर, ता. ३१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. या अनोख्या उपक्रमासाठी हालेवाडी (ता. आजरा) येथील दुर्गामाता दूध संस्थेतर्फे मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्याचा निर्णय झाला. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील होते.
पाटील म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून संस्थेने गावातील ३०० घरांना मोफत तिरंगा ध्वज देण्याचा निर्णय घेतला आहे.’’ या वेळी संस्थेचे अध्यक्ष अमर पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक महादेव खवरे, हंबीरराव पाटील, वसंत पाटील, शामराव पन्हाळकर, अनुसया आजगेकर, सुरेश कांबळे, मधुकर जाधव, शरद लोहार, सुमन पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02181 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top