आंबेओहळ धरणग्रस्तांचा निवडणूकीवर बहिस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेओहळ धरणग्रस्तांचा निवडणूकीवर बहिस्कार
आंबेओहळ धरणग्रस्तांचा निवडणूकीवर बहिस्कार

आंबेओहळ धरणग्रस्तांचा निवडणूकीवर बहिस्कार

sakal_logo
By

आंबेओहळ धरणग्रस्तांचा
निवडणुकीवर बहिष्कार
उत्तूर, ता. ११ : आंबेओहळ धरणग्रस्तांचे अनेक प्रश्‍न रखडले आहेत. या निषेधार्थ आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संग्राम संघटनेने घेतला आहे. संघटनेची बैठक आरदाळ (ता. आजरा) येथे झाली. अध्यक्षस्थानी शिवाजी गुरव होते.
धरणग्रस्तांचे अनेक प्रश्‍न शिल्लक आहेत. संकलन दुरुस्ती, पुनर्वसन, जमीन सपाटीकरण, जमीन संपादन करून त्या धरणग्रस्तांना देणे, १८ नागरी सुविधांसह गावठाणे तयार करणे, त्यामधील भूखंड वाटप करणे, सांडवा व धरण यांच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या जमिनीकडे जाण्यासाठी पूल बांधून रस्ता करणे, कुटुंब संख्येप्रमाणे चार एकरांपेक्षा जास्त जमीन लागणाऱ्या धरणग्रस्तांचा मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून त्यांना न्याय देणे, धरणग्रस्त दाखले देणे, दाखला मिळालेल्या कुटुंबांना विनाअट नोकरी देणे, नोकरी न देता जे कर्जबाजारी झाले त्यांना व्यवसायासाठी दहा लाख रुपये देणे, असे अनेक प्रश्‍न मार्गी लागलेले नाहीत. पुनर्वसनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची लेखी हमी संघटनेला देणाऱ्यांच्या पाठीशी राहू, अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालू, असे बैठकीत ठरले. यावेळी सदू शिवणे, बाबू नाईक, शशिकांत तोरस्कर, आनंदा गुरव, शंकर पोटे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते. विशाल गुरव यांनी आभार मानले.
.०००००००००००००००००००००००००००००..

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02209 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..