१००० प्लेट शाबुदाना खिचडी, वड्यावर ताव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१००० प्लेट शाबुदाना खिचडी, वड्यावर ताव!
१००० प्लेट शाबुदाना खिचडी, वड्यावर ताव!

१००० प्लेट शाबुदाना खिचडी, वड्यावर ताव!

sakal_logo
By

55444
45006
45008

शाबू वड्याची
उत्तूरला क्रेझ
पदार्थ झाला लोकप्रिय; लहान-मोठ्या ६१ हॉटेल्समध्ये उपलब्ध
अशोक तोरस्कर : सकाळ वृतसेवा
उत्तूर, ता. २३ : साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे उपवासाचे पदार्थ उत्तूर (ता. आजरा) येथील हॉटेल्समध्ये लोकप्रिय झाले आहेत. या ठिकाणी लहान-मोठी ६१ हाटेल आहेत. श्रावण महिन्यात दर सोमवारी उत्तूरमध्ये एक हजार प्लेट खिचडी व वड्याची विक्री होते.
धार्मिक कारणांसाठी उपवास करणे, ही प्रथा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र, श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास धरला जातो. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवड्यातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवारी उपवास करतात. रोजच्या जेवणातल्या पदार्थापेक्षा वेगळ्या वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. हल्ली उपवास नसतानासुध्दा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वड्यासारखे पदार्थ हॉटेल्समधून खूपच लोकप्रिय झाले आहेत.
-----------------
कोट
उपवासात सामान्यतः धान्य खाऊ नये, असे मानतात. त्यातील एक पर्याय म्हणजे जे धान्य नाही, पण धान्यासारखे रुचकर, ऊर्जादायक आहे. शाबू या निकषात बसतो. शाबूमध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे यातून लगेच ऊर्जा मिळते. हा पचायला जड असलेने पोट भरल्याचे समाधान मिळते. लवकर भूकही लागत नाही.
- डॉ. भरत मोहिते
--------------
साबूदाणा एका झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. यात प्रथम वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला टॅपिओका म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या-छोट्या गोळ्या बनवतात. यामध्ये स्टार्च असलेने लगेच ऊर्जा मिळते.
- शिवाजी गडकरी, कृषी सहायक, उत्तूर
----------------
या परिसरात साबुदाणा खिचडी, शाबू वडा हे पदार्थ लोकप्रिय आहेत. ते उपवासात चालणारे असल्याने दर सोमवारी मागणी भरपूर वाढते.
- वैभव गुरव, हॉटेल व्यावसायिक, उत्तूर
-------------------
साबूदाण्याचे फायदा-पचनक्रिया सुधारते
- शरीरातील उष्णता कमी करते
- रक्तदाब नियंत्रित राहतो
- शारीरिक शक्ती वाढते
- हाडे मजबूत राहतात
- मसपेशींचा विकास होतो- वजन वाढण्यास मदत होते
- थकवा दूर होतोl

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02233 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..