संयुक्त भगवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीवर ‘संघर्ष’ची मोहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संयुक्त भगवा प्रतिष्ठानच्या 
दहीहंडीवर ‘संघर्ष’ची मोहर
संयुक्त भगवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीवर ‘संघर्ष’ची मोहर

संयुक्त भगवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीवर ‘संघर्ष’ची मोहर

sakal_logo
By

उत्तूर : संयुक्त भगवा प्रतिष्ठानची दहीहंडी फोडताना गडहिंग्लजचा संघर्ष ग्रुप.

संयुक्त भगवा प्रतिष्ठानच्या
दहीहंडीवर ‘संघर्ष’ची मोहर
उत्तूर, ता. २५ : येथील संयुक्त भगवा प्रतिष्ठानतर्फे बांधण्यात आलेली दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुपने फोडून ५१ हजार रुपये रोख व चषक मिळवला. ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. संघर्ष ग्रुप, नवज्योत ग्रुप गडहिंग्लज, गोविंदा पथक हाडलगे, आम्ही भडगावकर ग्रुप, न्यू फ्रेंड सर्कल (भडगाव) या संघांनी आपला सहभाग नोंदविला. पुरुषोत्तम करंडक विजेती समीक्षा संकपाळ, लावणी सम्राट किरण पवार यांची उपस्थिती होती. विद्युत रोषणाईचा झगमगाट, युवकांच्या प्रचंड जल्लोषात दहीहंडीचा कार्यक्रम झाला. या वेळी माजी सभापती वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, मारुतीराव घोरपडे, गणपतराव सांगले, विठ्ठल उत्तूरकर, तुषार घोरपडे, योगेश भाईगडे, सुधीर सावंत, विजय गुरव, प्रशांत हातरगे उपस्थित होते. सुधाकर मुळीक यांनी सूत्रसंचालन केले. संजय धुरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02241 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..