आंतरभारती शिक्षण मंडळाची पोलिसात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरभारती शिक्षण मंडळाची पोलिसात तक्रार
आंतरभारती शिक्षण मंडळाची पोलिसात तक्रार

आंतरभारती शिक्षण मंडळाची पोलिसात तक्रार

sakal_logo
By

आंतरभारती शिक्षण
मंडळाची पोलिसांत तक्रार
उत्तूर, ता. ३० : बेकायदा सभा घेऊन उत्तूर (ता. आजरा) येथील आंतरभारती शिक्षण मंडळाची फसवणूक केली आहे. याची सखोल चौकशी व्हावी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार संस्थेचे सचिव अनंतराव आजगावकर व संचालक भिकाजी दत्तू ढोणूक्षे यांनी आजरा पोलिसांत दिली. नीळकंठ त्रंबक ठाकूर यांनी आंतर भारती शिक्षण संस्थेची बेकायदेशीर सभा घेण्याचा प्रयत्न केला. या सभेला सचिव म्हणून सही करून पोलिस संरक्षणासाठी मागणी केली. ठाकूर यांना कोणतेही अधिकार नसताना संस्थेची व आमची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
----------------
संस्थेची सभा कायदेशीर : ठाकूर
उत्तूर : आंतर भारती शिक्षण मंडळाची रविवारी (ता. २८) झालेली सभा संस्थेच्या उपविधीनुसार झाली असल्याने पूर्णपणे कायदेशीर कामकाज झाले आहे, असे पत्रक नीळकंठ ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. २०१८ ला संस्थेने सभासद करून घेतले. आॕगस्ट २०२१ ला नवीन कार्यकारिणी निवडताना सभासदांनी अनंतराव आजगावकर यांच्या वयाचा विचार करून नवीन कार्यकारिणी निवडली. यामध्ये माजी सचिव व विजय देसाई यांची निवड केली. आजगावकर यांच्या वयाचा गैरफायदा घेऊन मुख्याध्यापकांना, संचालकांना धमकावण्याचे प्रयत्न कायदेशीर मार्गाने समाप्त होतील, असे पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02245 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..