आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केली ई-सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केली ई-सायकल
आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केली ई-सायकल

आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केली ई-सायकल

sakal_logo
By

51807
ई-सायकलसोबत मयंक पोकळे.

आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केली ई-सायकल
अशोक तोरस्कर : सकाळ वृत्तसेवा
उत्तूर, ता. २० : येथील जैनगल्लीतील मयंक उमेश पोकळे या आठवीतील विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. या सायकलवरून शाळेला जाण्यासाठी उत्तूर ते गडहिंग्लज असा त्याचा प्रवास तो या सायकलवरून करतो.
मयंक हा लहानपणापासून चिकित्सक व जिज्ञासू आहे. नवीन कलात्मक शोध लावणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचा त्याला छंद आहे. नवीन बाजारात आलेल्या इलेक्ट्रिक मोटार पाहून त्याने इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गुगलवर माहिती घेऊन आॕनलाईन पार्ट मागवले व घरीच आपल्या सायकलला जोडले. यासाठी त्याने चार्जिंग बॕटरी, मोटर, चेनव्हील, स्विच इत्यादी उपकरणे वापरली. त्याने स्वतः उत्तूर -गडहिंग्लज असा २५ किमीचा प्रवास केला व हा प्रयोग पालकांना यशस्वी करून दाखवला. यासाठी त्याला वडील उमेश पोकळे, आई बिना, बहीण तेजल व मिताली यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्याच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेऊन येथील नेहरू चौकातील हनुमान तरुण मंडळाने त्याचा सत्कार केला. या वेळी पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई, देशभूषण देशमाने, पुंडलिक पाटील, सुजित लोखंडे, मुकुंद पाटील, अजित उत्तूरकर, महेश करंबळी, भारत लोखंडे, राजू पाटील, प्रशांत पोतदार, भारती देशमाने उपस्थित होते.
------------------
चौकट
इलेक्ट्रिक मोटार खरेदी करण्याइतकी ज्यांची ऐपत नसेल, तर मयंकचा आदर्श घेऊन शालेय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकल तयार करता येईल. ग्रामीण भागात २० ते २५ किमी परिसरात प्रवासासाठी इलेक्ट्रिक सायकल उत्तम पर्याय होईल.
- शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य, उत्तूर
--------------------
दृष्टिक्षेप
- सायकल चार्ज करता येते. गरज पडल्यास पॅडलद्वारेही सायकल चालवता येते
- यात सेल्फ स्टार्टचा पर्यायदेखील आहे
- सायकल २० किमी प्रतितास वेगाने धावते यासाठी केवळ ५ रुपये खर्च येतो. यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होऊ शकते.
- सध्या सातवी-आठवीमधील विद्यार्थी मोटर सायकलचा वापर करताना दिसतात. यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतो. याला पर्याय ही ई-सायकल ठरू शकते
- ग्रामीण भागात विद्यार्थ्याना शिक्षणसाठी परगावी जाणेसाठी बसचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. विद्यार्थीनी ई-सायकल वापरल्यास वेळेची व पैशाची बचत होईल त्यांचा व्यायामही होईल..

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02278 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..