नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये ‘ वाचन प्रेरणा दिन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये ‘ वाचन प्रेरणा दिन’
नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये ‘ वाचन प्रेरणा दिन’

नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये ‘ वाचन प्रेरणा दिन’

sakal_logo
By

‘नव कृष्णा’मध्ये वाचन प्रेरणा दिन
उत्तूर ः भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी नव कृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य रामकृष्ण मगदूम होते. प्रा. विनायक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन पांडुरंग कांबळे व भारत गावडे यांच्याहस्ते झाले. नम्रता पाटील, तनुजा मगदूम यांची भाषणे झाली. छाया मगदूम, शरयु पाटील, विशाल वडवळे, गीता पाटील, विद्या शिवणे यांनी नियोजन केले. संध्या मोरबाळे यांनी सूत्रसंचालन केले.