आपटे फौंडेशनकडून ८७५ कुटूंबाना फराळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपटे फौंडेशनकडून ८७५ कुटूंबाना फराळ वाटप
आपटे फौंडेशनकडून ८७५ कुटूंबाना फराळ वाटप

आपटे फौंडेशनकडून ८७५ कुटूंबाना फराळ वाटप

sakal_logo
By

03222
-----------------------
आपटे फौंडेशनकडून
८७५ कुटूंबाना फराळ वाटप
उत्तूर, ता. २५ ः येथील मुकुंदराव (दादा) आपटे फौंडेशनतर्फे उतूर जिल्हा परिषद मतदारसंघात दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांच्या संकल्पनेतून पाच वर्षे हा उपक्रम सुरु आहे. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना वंचित घटकांना यामध्ये सहभागी  होता यावे यासाठी  सामाजिक बांधिलकी  जपत हा उपक्रम राबवला आहे. ज्यांच्या  घरात वर्षभरात दुखःद  प्रसंग घडला तर त्यांच्या घरात दिवाळीचा फराळ बनवला जात नाही. या कुटुंबांना, मुस्लिम व ख्रिश्चन बांधव अशा २२ गावांतील ८७५ कुटुंबांना फराळाचे वाटप झाले. महिनाभर फौंडेशनचे कार्यकर्ते यासाठी नियोजन करीत आहेत. सरपंच वैशाली आपटे, संजय आपटे, वनिता आपटे, महेश करंबळी, किरण आमणगी, राजू खोराटे, संजय उतूरकर, संभाजी कुराडे, जोतिबा पोवार, उषा चव्हाण, बबन इंगळे, अमित येसादे आदिंनी परिश्रम घेतले.