आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन
आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन

आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन

sakal_logo
By

आजरा महाविद्यालय
आजरा ः येथील आजरा महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा झाला. या वेळी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. राष्ट्रीय एकता दिना निमित्ताने आजरा शहरांमधून रॅली काढण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी एन एस एस प्रकल्प अधिकारी डॉ. रणजित पवार यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या देश विकासातील योगदान या विषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. एस. के. चव्हाण एनसीसी ऑफिसर यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. या उपक्रमास महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी  उपस्थित होते.