उत्तूर येथे त्रिपुरारी पोर्णमेनिमित्य दिपोत्सव. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर येथे त्रिपुरारी पोर्णमेनिमित्य दिपोत्सव.
उत्तूर येथे त्रिपुरारी पोर्णमेनिमित्य दिपोत्सव.

उत्तूर येथे त्रिपुरारी पोर्णमेनिमित्य दिपोत्सव.

sakal_logo
By

03260
उत्तूर ः छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दीपोत्सव झाला.
------------
उत्तूरमध्ये त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त दीपोत्सव
उत्तूर, ता. ८ ः येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज व जिजाऊ फाऊंडेशनतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रांगोळी प्रदर्शन व दीपोत्सवाचे आयोजन केले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज याविषयी समाज प्रबोधन रांगोळीच्या माध्यमातून केले. परीसरात ५५१ पणत्या लावल्या. एक पणती जाणता राजासाठी व एक पणती पर्यावरण रक्षणासाठी’ असे ब्रिदवाक्य घेवून हा उपक्रम घेण्यात आला.
उद्‍घाटन सरपंच  वैशाली आपटे, धामणेचे सरपंच शिवाजी लोकरे, जिजाऊ फाऊंडेशनचे सोनू भाईगडे, गणपतराव चव्हाण, विजय पाकले, संतोष शिवणे उपस्थित होते. उपक्रम प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या शिवणे, संदीप भदरगे, मानसी पाकले, गीता पाटील, रेश्मा माळवकर, शरयू पाटील, विशाल वडवळे व प्राची येजरे यांनी राबवला.