उत्तूर परिसरात आढळले ५३ प्रकारचे पक्षी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर परिसरात आढळले ५३ प्रकारचे पक्षी
उत्तूर परिसरात आढळले ५३ प्रकारचे पक्षी

उत्तूर परिसरात आढळले ५३ प्रकारचे पक्षी

sakal_logo
By

03284
उत्तूर ः बेलेवाडी घाटात पक्षी निरिक्षण करताना विद्यार्थी.
-------------

उत्तूर परिसरात आढळले ५३ प्रकारचे पक्षी
उत्तूर, ता. १६ ः अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन (५ नोव्हेंबर) ते थोर भारतीय पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती (१२ नोव्हेंबर) या दोन्ही विभूतींना मानवंदना म्हणून येथील नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सतर्फे पक्षी सप्ताहाचे आयोजन केले होते.
निसर्गभ्रमंती व पक्षी निरीक्षणच्या माध्यमातून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धन व संरक्षणाची गोडी लागावी यासाठी हा पक्षी सप्ताह झाला. स्लाईड शो, निसर्गभ्रमंती आणि पक्षिनिरीक्षण असे उपक्रमाचे स्वरूप होते. पक्षी अभ्यासक रामकृष्ण मगदूम यांनी मार्गदर्शन केले.
उत्तूर, धामणे, चव्हाणवाडी, बेलेवाडी परिसरात पक्षी निरीक्षण केले. यामध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज,  केंद्रीय शाळा, प्राथमिक विद्यामंदिर धामणे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या दरम्यान ५३ प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. स्थानिक स्थलांतर करणारे हळद्या, राखाी धनेश, भांडिक, पाकोळी, रंगीत करकोचा, काळा शराटी, हिरवे कबुतर, नदी सुरय, भात टिटर, प्लवर, धोबी, इ. पक्षी आढळले तर सुंदर वैशिष्ट्यपूर्ण रंग, पंख अथवा पिसे यामुळे सुंदर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय नर्तक, कार्डनिल, ब्राम्हणी घार, चेस्टनट बी ईटर, हुदहुद इ. पक्षी पाहायला मिळाले. उपक्रमाचे आयोजन छाया मगदूम, विद्या शिवणे, शरयू पाटील, नम्रता पाटील, मानसी पाकले यांनी केले.