उतूर परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उतूर परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक
उतूर परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

उतूर परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

sakal_logo
By

उत्तूर परिसरातील
वाढती गुन्हेगारी चिंताजनक
उत्तूर, ता. २० ः परिसरात चोरी, घरफोडी, गोळीबार, जीवघेणा हल्ला, तरुण मुलींचे गायब होणे, वाहन चोरी या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीचा हा वाढता आलेख चिंताजनक आहे.
बेलेवाडी येथील ट्रॅक्टर चोरीला गेला. हालेवाडी येथील लक्ष्मी मंदिरातील सोने चोरीला गेले. बहिरेवाडी येथे एका रात्रीत पाच ठिकाणी घरफोडी झाली. पाठोपाठ मुमेवाडी येथे आठ ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम गायब झाली. येथे सोनाराला लुटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चोरट्यांनी हवेत गोळीबार केला. यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास लागला नाही.
उत्तूर आऊटपोस्ट पोलिस ठाण्याकडे चार पोलिसांची नेमणूक आहे. २२ गावांचा कारभार आहे. दोन पोलिस वर्षभर हालेवाडी भैरीदेव मंदिराच्या संरक्षणासाठी असतात. एका पोलिसाची आजरा येथे नेमणूक असते. रोजच्या तक्रारींचे निपटारा करण्यात एका पोलिसाचा दिवस निघून जातो. त्यामुळे मोठ्या गुन्ह्याचा तपास होतच नाही.
------------------
चोरट्यांना अटक नाही
चार दिवसांपूर्वी बेलेवाडी घाटात ट्रॅक्टरचालकांवर जीवघेणा हल्ला झाला. याचे कारण अद्याप पोलिस शोधू शकले नाहीत. उत्तूरमध्ये झालेल्या गोळीबारातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
----------------
अशोक तोरस्कर, उत्तूर