हालेवाडीत किसान क्रेडिट कार्ड वाटप. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हालेवाडीत किसान क्रेडिट कार्ड वाटप.
हालेवाडीत किसान क्रेडिट कार्ड वाटप.

हालेवाडीत किसान क्रेडिट कार्ड वाटप.

sakal_logo
By

हालेवाडीत किसान क्रेडिट कार्ड दूध उत्पादकांना लाभ
उत्तूर ता.२३ : दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी मदतीसाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत  हालेवाडी (ता. आजरा ) दुर्गामाता दूध संस्थेच्या सभासदांना कार्ड वाटप झाले. किसान क्रेडिट कार्ड सुविधेची उपयुक्ता व शेतकऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या स्वावलंबी (आत्मनिर्भर)  धोरणांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह आता दुग्ध व्यवसायासाठी अल्पमुदतीचा खेळते भांडवल कर्जपुरवठा किसान क्रेडिट कार्डावर उपलब्ध केला जात आहे. त्यानुसार दूध संघ, दूध उत्पादक कंपन्यांचे संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना ''केसीसी'' उपलब्ध करून देण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येत आहे अमर तुकाराम पाटील, प्रकाश यशवंत पाटील, लता आनंदा जाधव, शामराव अंतू पन्हाळकर, सुरेश जनार्दन पन्हाळकर, सुशीला तुकाराम पाटील, वसंत महादेव पाटील,अशोक गणपती कांबळे,वसंत भैरू खवरे,दूध उत्पादकांना कार्ड प्राप्त झाले .
तीन टक्के दराने कर्ज
या मोहिमेत दूध संस्थेच्या सर्व सभासदांना बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्डांचे वाटप केले जाणार आहे. कार्ड असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा वाढवली जाणार आहे. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वृद्धीसाठी तीन टक्के व्याजदराने कर्ज दिली जाणार आहे.