जाधेवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

जाधेवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

क्रशरप्रश्नी जाधेवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
उत्तूर ः जाधेवाडी (ता. आजरा) येथे ग्रामस्थांचा विरोध डावलून क्रशर सुरू आहे. हा क्रशर बंद करावा, अन्यथा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आजरा तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की क्रशरमुळे ग्रामस्थांच्या जमिनीचे व गावचे होणारे नुकसान याची सविस्तर माहिती वेळोवेळी प्रशासनाला दिली आहे. क्रशरला विरोध असताना गावच्या हद्दीत संबंधित कंपनीने क्रशर सुरू केला. क्रशरसाठी जमिनीतून दगड काढताना मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जाते. या ब्लास्टिंगमुळे अनेक ग्रामस्थांच्या घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत. धुळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. क्रशरला विरोध दर्शवत असताना क्रशरवरील कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना जबर मारहाण केली. त्यात अनेक महिला व वयोवृद्ध जखमी झाले. गावकऱ्यांना मारहाण करून उलट गावकऱ्यांवर खोट्या केसेस नोंदविल्या. या सर्व घटनांचा विचार करून क्रशर बंद करावा. निवेदनावर बबन सावंत, मारुती हारेकर, बाबूराव करडे, दत्तात्रय सावंत, मारुती भुजंग यांच्यासह १०० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com