Sat, June 3, 2023

भादवण येथून मोटरसायकलची चोरी
भादवण येथून मोटरसायकलची चोरी
Published on : 30 January 2023, 5:52 am
भादवण येथून दुचाकीची चोरी
उतूर ः भादवण (ता. आजरा) येथून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत रणजीत गुंडा कांबळे (रा. शेणगाव ता. भुदरगड) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. रणजीत रात्री ११वाजता आपली दुचाकी (क्रमांक एम एच ०९एफ डब्लू ५९१८) जुन्या संघाच्या समोर लावून ते आर्केस्ट्रा बघायला गेला. रात्री १.३० वाजता तो परत आला. यावेळी त्याला दुचाकी चोरीला गेलेचे लक्षात आले. तपास हवालदार राजेश आंबूलकर करीत आहेत.