
उतूरला आज विकासकामांचा प्रारंभ
उत्तूरला आज विकासकामांचा प्रारंभ
उत्तूर, ता. २३ ः येथे दहा कोटींची उत्तूर नळपाणी पुरवठा योजना व ४० लाखांचा महादेव मंदिर सांस्कृतिक सभागृह या दोन्ही कामांचा प्रारंभ उद्या (ता. २४) आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी सभापती वसंतराव धुरे यांनी दिली.
उत्तूर गाव व जवळील वाढीव लोकवस्तीसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी दहा कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. उत्तूरजवळील आंबेआओहळ प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पातून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. येथील महादेव मंदिराजवळ सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य उमेश आपटे, माजी उपसभापती शिरीष देसाई, साखर कारखाना संचालक मारुतीराव घोरपडे, सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.