
उतूरला विविध विकासकामांचा शुभारंभ.
03523
उत्तूरला विविध विकासकामांचा प्रारंभ
उत्तूर, ता. २४ ः उत्तूर (ता. आजरा) येथे १० कोटींची उत्तूर नळपाणी पुरवठा योजना व ४० लाखांचे महादेव मंदिर सांस्कृतिक सभागृह या दोन्ही कामांचा प्रारंभ माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.
सरपंच किरण आमणगी यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘अनेक दिवसांपासून उत्तूरजवळील वाढीव लोकवस्तीसाठी पिण्याचे पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. महाआघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री असताना यासाठी निधीची तरतूद केली. जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली यामुळे माता-भगिनींच्या डोक्यावरची घागर कायमची उतरणार आहे. ही योजना भविष्यात ५० वर्षे चालेल. असे काम या योजनेचे व्हावे. २४ तास मुबलक पाणी उपलब्ध व्हावे; असे नियोजन करावे.
माजी सभापती धुरे म्हणाले, ‘आमदार मुश्रीफ यांनी कोट्यवधीची विकास कामे या विभागात राबवली. त्यांच्या प्रयत्नातून आंबेओहळ प्रकल्प साकारल्याने परिसरात नंदनवन फुलेल.’ यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, साखर कारखाना संचालक मारुतीराव घोरपडे, काशिनाथ तेली, माजी सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच समीक्षा देसाई, रमेश ढोणूक्षे, गंगाधर हराळे, डॉ. प्रकाश तौकरी, प्रकाश खटावकर, गणपती सांगले, संजय गुरबे, बबनराव पाटील, विजय वांगणेकर, मीनाक्षी तौकरी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. माजी उपसभापती शिरीष देसाई यांनी आभार मानले.