महागोंड परिसरात वाघाचा वावर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागोंड परिसरात वाघाचा वावर.
महागोंड परिसरात वाघाचा वावर.

महागोंड परिसरात वाघाचा वावर.

sakal_logo
By

03526, 03525
महागोंड ः येथे आढळलेल्या वाघाच्या पाऊलखुणा. दुसऱ्या छायाचित्रात तारेतून उडी मारुन जाताना वाघाचे अडकलेले केस.
.....

पट्टेरी वाघाचा
महागोंडला वावर
उत्तूर, ता. २५ ः महागोंड (ता. आजरा) परिसरात चार दिवसांपासून पट्टेरी वाघाचा वावर आहे.  दोन दिवसांपूर्वी रात्री महागोंडहून चिमणेकडे जाणाऱ्या प्रवाशाला हा वाघ दिसला. त्यांनी मोबाईलवरुन ग्रामस्थांना माहिती दिली. सोशल मीडियावरुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
आज सकाळी ६.३० वाजता विष्णू माळवकर (रा. महागोंडवाडी)मशागतीसाठी गेले होते. यावेळी त्यांना वाघ दिसला. माळवकर यांची चाहुल लागताच वाघ तारेच्या कुंपणातून उडी मारुन पळून गेला. माळवदकर यांनी ही माहिती ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. वन विभागाचे पथक परिसरात दाखल झाले. त्यांनी पायाच्या ठशांचे निरीक्षण केले. वाघ चिमणेच्या दिशेने गेलेले आढळले. या भागात वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे वन विभागाचे वनरक्षक रणजीत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान चिमणे, बेलेवाडी, चव्हाणवाडी गावात संस्कार वाहिनीवरुन माहिती देण्यात आली. रात्री ऊसाला पाणी पाण्यासाठी जाणाऱ्या शेतक-यांनी सावधानता बाळगावी; असे सांगण्यात आले. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी बेलेवाडीच्या जंगलात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतक-यांना गुरगुरण्याचा आवाज आला होता. हा आवाज ऐकून शेतकरी घाबरुन गावी परतले. वनविभागाने परिसराची पाणी केली; मात्र वाघाच्या पाऊलखुणा सापडल्या नाहीत. तो तरस किंवा रानटी कुत्रा असावा; असा निष्कर्ष काढला.
-----------------
वाघ की बिबट्या?
या परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र वाघाचे पहिल्यांदा अस्तित्व जाणवत आहे. पायाच्या ठशांवरुन तो वाघ असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.