चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू.
चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू.

चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू.

sakal_logo
By

03557
...

चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू

उत्तूर ता.८ ः चिमणे (ता.आजरा ) येथे शेतातील गवताचा बांध जाळताना आगीत होरपळून विठोबा भिमा नादवडेकर (वय  ८०) या  शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी एक वाजता ‘रांग’ नावाच्या शेतात ही घटना घडली. घटनेची नोंद पोलिसांत झालेली नाही. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नादवडेकर सकाळी दहा वाजता शेताकडे गेले होते. शेतातील पालापाचोळा गोळा करुन त्यांनी बांधाजवळ पेटविला. बांधाला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. नादवडेकर यांच्या डोळ्यांवर चष्मा असल्याने व झालेल्या धुरामुळे त्यांना परिस्थितीचा अंदाज आला नाही.  आगीने त्यांना घेरले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणी नसल्याने मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यातच त्यांचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने एक ग्रामस्थ कोणी आग लावली हे पाहण्यासाठी आले असता त्यांना नादवडेकर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मागे मुलगी व जावई आहे.