उत्तूर नळपाणी पुरवठा योजनेचा भुमीपुजन समारंभ संपन्न. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर नळपाणी पुरवठा योजनेचा भुमीपुजन समारंभ संपन्न.
उत्तूर नळपाणी पुरवठा योजनेचा भुमीपुजन समारंभ संपन्न.

उत्तूर नळपाणी पुरवठा योजनेचा भुमीपुजन समारंभ संपन्न.

sakal_logo
By

03577
उत्तूर नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
उत्तूर, ता. २० ः ‘केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत कर्पेवाडी (ता. आजरा) येथे १२ कोटी २० लाख ३८ हजारांच्या पिण्याच्या पाण्याच्या    योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या हस्ते झाले.
ठेकेदार संपत मेडसिंगे यानी स्वागत केले. यावेळी श्री. घाटगे म्हणाले, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील ३० वर्षांतील गावच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना तयार केली. योजना ही एक वर्षाच्या आत पूर्णत्वास जाईल.’ यावेळी प्रदीप लोकरे, भास्कर भाईगडे, मंदार हळवणकर, धोंडीराम सावंत, विठ्ठल उत्तूरकर, संदेश रायकर, सविता सावंत, सुजाता मुळीक, सुशांत अमनगी, श्रीपती यादव, बाळासाहेब सावंत, प्रवीण लोकरे, दीपक आमणगी  उपस्थित होते. तलावामध्ये फ्लोटिंग पंप बसविली जाणारी जिल्ह्यातील ही पहिलीच नळपाणी पुरवठा योजना साकारत असून या योजनेतील सर्वच पंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत; अशी माहिती सहाय्यक अभियंता स्वप्नील जाधव यांनी दिली.