‘आंबेओहोळ’ पंधरा वर्षे का रेंगाळला

‘आंबेओहोळ’ पंधरा वर्षे का रेंगाळला

03579
उत्तूर ः येथील नेहरू चौकातील सभेत समरजीत घाटगे यांनी मार्गदर्शन केले. अशोकअण्णा चराटी, प्रकाश चव्हाण, श्रीपती यादव, विठ्ठल उतूरकर आदी उपस्थित होते.
-------------
‘आंबेओहोळ’ पंधरा वर्षे का रेंगाळला
समरजीत घाटगे यांचा सवाल; उत्तुरमधील नेहरू चौकात सभा
उत्तूर, ता. २१ ः तीनशे कोटींचा स्वतःचा खासगी साखर कारखाना केवळ तीन वर्षात उभा राहतो. मात्र उत्तुर विभागासाठी नवसंजीवन असणारा आंबेओहोळ प्रकल्प पंधरा वर्षे का रेंगाळला? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.
उत्तुर (ता. आजरा) येथील नेहरु चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भाजपाचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २२७ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळेच बरेच दिवस रखडलेला हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. विरोधकांनी मात्र याचे श्रेय घेण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या केवळ घोषणा केल्या.’
एस. टी. महामंडळाने महिलांना प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिल्याने येथील महिलांतर्फे समरजीत घाटगे यांचा सत्कार केला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी म्हणाले, ‘येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवणार व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या परिसरातून  समरजीत घाटगे यांना  मताधिक्य देणार.’ सुजाता मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य  संदेश रायकर, सविता सावंत प्रदीप लोकरे, धोंडीराम सावंत,  बाळासाहेब सावंत, प्रवीण लोकरे, श्रीपती यादव,  सागर येसादे, पूजा झेंडे-पाटील   उपस्थित होते. भास्कर भाईगडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com