Sun, May 28, 2023

उत्तूरला सोमवारी गाथा महाराष्ट्राची कार्यक्रम.
उत्तूरला सोमवारी गाथा महाराष्ट्राची कार्यक्रम.
Published on : 23 March 2023, 6:57 am
उत्तूरला ‘गाथा महाराष्ट्राची’ २७ ला
उत्तूर ः उत्तूर (ता. आजरा) येथील न्यू महालक्ष्मी तरुण मंडळाच्या वतीने हिंदू नववर्ष व रामनवमीनिमित्त सोमवारी (ता. २७) ''गाथा महाराष्ट्राची'' कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात भूपाळी, ओव्या, दिंडी, भारुड ,पोवाडा, शेतकरी नृत्य , लावणी, पिंगळा , वासुदेव ,गोंधळी, आदिवासी ,कडकलक्ष्मी लोककलासह कारभारणी बरोबर बैलगाडी घेऊन जाणारा शेतकरी व नयनरम्य नृत्याविष्कारासह ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम येथील केंद्र शाळा पटांगणात रात्री होणार आहे .मुकुंदरावदादा आपटे फाउंडेशन व न्यू महालक्ष्मी तरुण मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले.