उतूरला शेतकरी मेळावा संपन्न.

उतूरला शेतकरी मेळावा संपन्न.

03587
उतूरला शेतकरी मेळावा
उत्तूर ः येथील धुरे मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा झाला. मंडलातील ४०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन यांनी  स्वागत करुन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली. भादवणचे प्रगतशील शेतकरी अशोक गोईलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ .अंकुश चोरमोले यांनी ऊस पीक तंत्रज्ञान व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण, खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच किरण आमनगी, नामदेव जाधव (झुलपेवाडी), मच्छिंद्र कडगावकर (कर्पेवाडी), सूर्यकांत पाटील (आरदाळ), राजाराम खोराटे, सदानंद व्हनबट्टे, मंडल कृषी अधिकारी पी. जी. पाटील, एस. टी. गुरव, कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. पाटील, कृषी सहाय्यक एस. बी. गडकरी, जी. सी. बिक्कड व कृषी सेवा केंद्रचालक उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक व्ही. आर. दळवी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com