
उतूरला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
03685
उत्तूर ःयेथील सत्यमेव फौंडेशन पुरस्कार वितरण कार्यक्रमातील सत्कारमृती व मान्यवर.
-----------
सत्यमेव फौंडेशनच्या पुरस्काराचे वितरण
उत्तूर, ता. ७ ः समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निर्मळ भावनेतून सत्यमेव सेवा फौंडेशन, मुंबईत स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे, असे प्रतिपादन सत्यमेव फौडेशनचे संस्थापक सुनिल बोरनाक यांनी केले. येथील पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संदीप मेंगाणे होते. विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला. जान्हवी पाटील (गिर्यारोहक), सुशांत आपके (शौर्य), डॉ. शिवाजी पन्हाळे (सेवारत्न), शंकर केंगार (कलारत्न), गुरुप्रसाद जोशी (समाज), संजय खोचारे (आदर्श पत्रकार), दिनकर खवरे (सामाजिक योगदान), अर्चना तोंदले (आदर्श शिक्षिका), अंजू तूरंबेकर (क्रीडारत्न)
रामा लाखे ( कोविड योद्धा) यांचा गौरव केला. गुरुप्रसाद जोशी, टी. एस. गडकरी, संजय खोचारे, अंजु तुरंबेकर, तानाजी पावले, सचिन परीट, संतोष शिवणे यांची भाषणे झाली. प्राचार्य रामकृष्ण मगदूम, दत्तात्रय चौगले, सरपंच दिनकर खवरे, किरण चव्हाण, अनिल जाधव, अवधुत पाटील उपस्थित होते. सतिश पाटील यांनी आभार मानले.