Sat, Sept 23, 2023

हालेवाडी फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक एक जखमी
हालेवाडी फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक एक जखमी
Published on : 4 June 2023, 1:50 am
हालेवाडी फाट्याजवळ दोन
मोटारींची समोरासमोर धडक
उत्तूर ः हालेवाडी (ता. आजरा) फाट्याजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन राजेंद्र शिवाजी पुरीबुवा (वय ३६, रा. चव्हाणवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पुरी बुवा हे आजऱ्याहून उत्तूरकडे येत होते. तर सुमित मुरलीधर नागदेव (रा. गांधीनगर) हे मोटारीतून आजऱ्याकडे जात होते. फाट्याच्या अलिकडे दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये पुरीबुवा यांची कार शेतात फेकली गेली. दोन्ही वाहनांच्या एअरबॅग खुलल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र पुरीबुवा हे गंभीर जखमी झाले. नागदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.