वडणगे- पशु वैद्यकीय सेवा महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे- पशु वैद्यकीय सेवा महागणार
वडणगे- पशु वैद्यकीय सेवा महागणार

वडणगे- पशु वैद्यकीय सेवा महागणार

sakal_logo
By

‘पशुसंवर्धन’च्या सेवाशुल्कात ७५ टक्के वाढ
२१ जूनपासून अंमलबजावणी ः तीन वर्षांनी शुल्कवाढीचे आयुक्तांना अधिकार
सुनील स. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २७ ः राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या दारात भेट देण्याबरोबरच शल्यचिकित्सा प्रकरण हाताळण्यासाठी सेवा दरात पन्नास ते ७५ टक्के इतकी वाढ केली आहे. सेवा शुल्क २१ जूनपासून अमलात येणार आहे. शिवाय पशुसंवर्धन आयुक्तांना तीन वर्षांनी सेवा शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन विभागातंर्गत सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांकडील पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्‍चित करून अनेक वर्षे उलटली. रुग्ण पशुंवर उपचार करण्यासाठी आावश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधे, शल्यचिकित्सेसाठी आवश्यक हत्यारे, उपकरणे, अवजारे यांच्या किमतीत वाढ झाल्याने विविध प्रकारच्या सेवांसाठीच्या सेवा शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
नगरपालिका किवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये औषधोपचार किंवा शल्यचिकित्सेसाठी एका भेटीला पूर्वी ७५ रुपये दयावे लागत होते आता १५० रुपये द्यावे लागणार आहेत. कार्यक्षेत्राबाहेर १५० ऐवजी २५० रुपये मोजावे लागतील. रात्रीच्या वेळी सेवा व जनन प्रक्रियेत बाधा आल्यास प्रत्येकी अतिरिक्त ७५ रुपये ऐवजी आता १०० रपये द्यावे लागतील.
गाय, म्हशीच्या आरोग्य दाखल्यासाठी १०० ऐवजी १५० रुपये, घोड्यासाठी २००, रासायनिक पृथ्थकरण न करता शवविच्छेदन दाखल्यांना मोठ्या जनावरांसाठी १५०, छोट्या जनावरांना १०० रुपये आकारले जाणार आहेत. श्‍वान व माजरांच्या मोठया शस्त्रक्रियांसाठी १५० रुपये, मोठ्या जनावरांना ७० व लहान जनावरांसाठी ५० रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. कृत्रिम रेतनासाठी दवाखान्यात आणि शेतकऱ्यांच्या दारात प्रत्येकी पन्नास, गर्भधारणा तपासणी व गाई म्हशीमधील वंधत्व तपासणीसाठी प्रत्येकी दहा रुपये द्यावे लागतील.

कोट
राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून पशु-पक्ष्यांना देण्यात येणाऱ्‍या विविध सेवा शुल्कामधील सुधारित दर हे प्रत्येक पशु-पक्षी तपासासाठी व चाचणीसाठीचे असतील. जनावरांच्या स्वास्थ विषयक सेवा केसपेपर मोफत असेल. उपचार, खच्चीकरणासाठी प्रत्येकी दहा रुपये रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी जनावारे, कुक्कुटपालन यासाठी प्रत्येकी एक रुपया शुल्क राहणार आहे ही सर्व सेवा शुल्क सुधारणा २१ जूनपासून अंमलात येईल.
-डॉ. विनोद पवार- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. कोल्हापूर

चौकट
दर कमी तरीही पशुपालकांसाठी शासकीय सेवेकडे पाठ
खासगी डॉक्टरांपेक्षा शासकीय पशुवैद्यकीय सेवांचे दर अत्यल्प आहेत. तरीही पशुपालक शासकीय पशुवैद्यकीय सेवेला प्रतिसाद देत नाहीत. दवाखान्यापर्यत पशु-पक्ष्यांना घेऊन जाण्यात येणाऱ्या‍ अडचणी, शासकीय दवाखान्याच गैरसोयीची वेळ, कर्मचारी कमी असलेल्याने सेवा देण्यात होणार विलंब, तुलनेत खासगी डॉक्टरांची सहज उपलब्धता यामुळे पशुपालक शासकीय पशुवैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Vad22b00721 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top