वडणगे --शालेय पोषण आहार योजनेचे होणार लेखापरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे --शालेय पोषण आहार योजनेचे होणार लेखापरीक्षण
वडणगे --शालेय पोषण आहार योजनेचे होणार लेखापरीक्षण

वडणगे --शालेय पोषण आहार योजनेचे होणार लेखापरीक्षण

sakal_logo
By

पोषण आहार फोटो

पोषण आहार योजनेचे होणार लेखापरीक्षण

२०१५ ते २०२० दरम्यानची तपासणी; माहिती सादर न करणाऱ्या शाळांवर कारवाई

सुनील स. पाटील ःसकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. १७ ः शालेय पोषण आहार योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे आता लेखापरीक्षण होणार आहे. त्यानुसार शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्याकडील २०१५ ते २०२० या कालावधीतील शालेय पोषण आहार योजनेच्या दप्तरची तपासणी केली जाणार आहे. याची माहिती सादर न करणाऱ्या आणि लेखापरीक्षणास उपस्थित न राहणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
राज्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून विविध प्रकारचे अनुदान शाळांना दिले जाते.
या अनुदानाचा योग्य पद्धतीने होतो का? हे तपासण्यासाठी शाळा, तालुका आणि जिल्हास्तरावर केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेमार्फत योजनेचे लेखापरीक्षण करण्यात येईल. या लेखापरीक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लेखापरीक्षणासाठी सर्व शाळांनी माहिती देणे अनिवार्य आहे. शाळांनी माहिती भरताना उपलब्ध सर्व अभिलेखाचा आधार घेऊन खरी आणि अचूक माहिती भरावी तालुका आणि जिल्ह्यांना माहिती भरावी लागणार आहे. तसेच आढावा घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळ उपब्लध करून दिले जाणार आहे
लेखापरीक्षणासाठी शाळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, शाळांनी कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही. लेखापरीक्षण पडताळणी दरम्यान माहिती सादर न करणाऱ्या शाळा प्रमुखांना २५ हजार रुपये दंड करण्यात येईल. तालुक्यांचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे, जिल्ह्यातील शाळांचे लेखापरीक्षण होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा कार्यालयाची राहील.
लेखापरीक्षणास उपस्थित न राहणाऱ्या शाळांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा कार्यालयाची राहील, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

कोट
शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणाऱ्या शाळांचे २०१५ ते २०२० या काळातील हे लेखापरीक्षण होणार आहे. जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या ३०४६ शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या नमुन्यानुसार शाळांकडून माहिती भरून घेतली जाणार आहे.
- दीपक माने, लेखाधिकारी, शालेय पोषण योजना, जिल्हा परिषद.

Web Title: Todays Latest Marathi News Vad22b00744 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..