
वडणगे -प्लास्टिक कचरा संकलन शुभारंभ
01280
वडणगे ः येथे प्लास्टिक कचरा संकलन उपक्रमाचा प्रारंभ करताना सरपंच सचिन चौगले, अनुराधा भोसले, संजय पाटील, डॉ. मंजुळा पिशवीकर, रमेश कुंभार, डॉ. अजित देवणे, सयाजी घोरपडे, सतीश पाटील, सीमा पोतदार, पूनम चौगले, भारतीय शेलार आदी.
वडणगेत कचरा व्यवस्थापनाचा प्रारंभ
‘अवनी’च्या कचरा वेचक महिला करणार प्लास्टिकचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. ६ ः येथे ग्रामपंचायत व अवनी संस्थेतर्फे संयुक्त सुका कचरा व्यवस्थापनाचा प्रारंभ झाला. या प्रकल्पांतर्गत ‘अवनी’ संस्थेच्या कचरा वेचक महिला आठवड्यातून एकदा प्रत्येक घरातून सुका कचरा गोळा करणार आहेत. त्यामुळे गावातील सुक्या कचऱ्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.
सरपंच सचिन चौगले, अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले आदींच्या उपस्थितीत प्रकल्पाचा प्रारंभ झाला.
अनुराधा भोसले म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे गावातील कचऱ्याचे निर्मूलन होईलच, शिवाय कचरा वेचक भगिनींना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा. भविष्यात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे प्रशिक्षण संस्थेमार्फत ग्रामस्थांना दिले जाईल.
सरपंच सचिन चौगले म्हणाले की, प्लास्टिकचे संकलन करून तो रिसायकल करून पुन्हा वापरणे अथवा रस्ते निर्मितीत वापर करणे हा मानस आहे. अवनी संस्थेच्या मदतीने भविष्यात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करू.
उपाध्यक्ष संजय पाटील, समन्वयक तैजुद्दीन पन्हाळकर, उपसरपंच रमेश कुंभार, सतीश पाटील, सयाजी घोरपडे, सीमा पोतदार, भारती शेलार, डॉ. मंजुळा पिशवीकर, डॉ. अजित देवणे, रणरागिणी महिला ग्राम संघाच्या सदस्या, ग्रामस्थ व कचरा वेचक भगिनी उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी आर. आर. भगत यांनी स्वागत केले. आक्काताई गोसावी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Vad22b00754 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..