वडणगे -के डी सी सी बँक शाखा सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे -के डी सी सी बँक शाखा सुरू करण्याची मागणी
वडणगे -के डी सी सी बँक शाखा सुरू करण्याची मागणी

वडणगे -के डी सी सी बँक शाखा सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

जिल्हा बँकेची शाखा
वडणगेत सुरू करा
अध्यक्ष मुश्रीफांना ग्रामस्थांचे निवेदन
वडणगे, ता. १४ ः कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेची येथे शाखा सुरू करावी, अशी मागणी वडणगे सेवा संस्था व ग्रामपंचायतीने केली आहे. या मागणीचे निवेदन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ व कार्यकारी संचालकांना पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘गावची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक आहे. गावात एक सेवा संस्था आहे. दोन पतसंस्था, दहा दूध संस्था आहेत. तीस बचत गट असून संजय गांधी निराधार योजनेसह अन्य विविध योजनांचे लाभार्थी गावात आहेत. आर्थिक व्यवहारासाठी निगवे दुमाला येथील शाखेत जावे लागते. मात्र, महिला, वयोवृद्धांना गैरसोय होत आहे.
गावात मोठी बाजारपेठ आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याचा विचार करून शेतकरी, तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी वडणगे येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनासोबत सेवा संस्था व ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची प्रतही बँक प्रशासनाला पाठवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vad22b00774 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..