वडणगे -शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे -शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन
वडणगे -शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

वडणगे -शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय
खुल्या निबंध स्पर्धा
वडणगे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. पूर्वप्राथमिक ते विद्यापीठस्तरीय शिक्षकांसाठी स्पर्धा आहे. १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर कालावधीत स्पर्धा होतील. शिक्षकांनी स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) निबंध स्वत: आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन डाएट प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रतिबिंबित झालेले पूर्वप्राथमिक शिक्षण हा स्पर्धेचा विषय आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण (पहिली ते आठवीला अध्ययन करणारे शिक्षक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण व शिक्षक शिक्षण म्हणजेच डीएड व बीएड अध्यापकाचार्य व प्राध्यापक अशा पाच स्तरावर स्पर्धा होईल. लेखनाचे माध्यम मराठी असून शब्दमर्यादा २५०० ते ३००० आहे. स्पर्धा विनाशुल्क आहे. स्पर्धेसाठी डायटचे प्राचार्य शेख यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. स्पर्धकांना निबंधासाठी संदर्भ साहित्यातून मजकूर आहे तसा घेतलेला नाही, याबाबतचे मुख्याध्यापक किंवा कार्यालयाप्रमुखांचे प्रतिज्ञापत्र जोडावे लागेल.