कोल्हापूर टपाल विभाग देशात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर टपाल विभाग देशात प्रथम
कोल्हापूर टपाल विभाग देशात प्रथम

कोल्हापूर टपाल विभाग देशात प्रथम

sakal_logo
By

कोल्हापूर टपाल विभाग देशात प्रथम
‘एक दिन में एक करोड’ मोहीम; एका दिवसांत ६० हजारांहून अधिक खाती
सुनील स. पाटील : सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. १३ : भारतीय डाक विभागातर्फे घेण्यात आलेल्या ‘एक दिन मे एक करोड’ मोहिमेत सर्वाधिक खाते काढून कोल्हापूर टपाल विभाग देशात नंबर वन ठरला. जिल्ह्याने सहा उपविभागात मिळून एका दिवसात बचत खात्याशी संबंधित ६० हजार ७४१ इतकी विक्रमी खाती काढली. ५८ हजार २४ खाती काढून छत्तीसगड राज्यातील रायपूर टपाल विभाग दुसऱ्यास्थानी, तर ५७ हजार ५०९ खाती काढून बिलासपूर टपाल विभाग तिसऱ्या स्थानावर राहिला.
टपाल खात्यांमधील विविध योजनांमध्ये चांगला व्याज परतावा मिळत असल्याने नागरिक या योजनांशी जोडले जाऊ लागले आहेत. भारतीय डाक विभागही या योजनांचा लाभ देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत असून, त्याचाच भाग म्हणून २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत देशभरातील टपाल कार्यालयामध्ये ‘एक दिन में एक करोड’ मोहीम आयोजित केली होती. याला कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून आवर्ती जमा खाती, मासिक उत्पन्न योजना, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत खाते, ज्येष्ठ नागरिक योजना, पीपीएफ यासह अन्य बचत खात्यांशी संबंधित तब्बल ६० हजार ७४१ खाती काढली.
-----------
२८ ते ३१ जानेवारी या काळातील खाती
उपविभाग*काढलेली खाते
पश्‍चिम*१३,८८६
उत्तर*११,१६८
कागल*१०,४९८
इचलकरंजी*१०,३०९
गडहिंग्लज*७,९४१
गारगोटी*६,९३९
----------------
कोट
ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा यासाठी कोल्हापूर डाक विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. महामेळाव्यातून देशात एका दिवसांत कोल्हापूर टपाल विभागाने सर्वाधिक खाती काढून अव्वल स्थान पटकावल्याने कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानस्पद बाब आहे.
- अर्जुन इंगळे, अधीक्षक, डाकघर, कोल्हापूर.