विविध शर्यंतींना वडणगेत प्रतिसाद

विविध शर्यंतींना वडणगेत प्रतिसाद

01478
वडणगे : येथे आयोजित बैलगाडी शर्यतीमधील विजेत्यांना बक्षीस देताना रवी पाटील, संजय पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, केवलसिंह रजपूत, सचिन चौगले आदी.

विविध शर्यतींना वडणगेत प्रतिसाद
वडणगे : येथे महाशिवरात्रीनिमित्त डी मेंबर्सतर्फे आयोजित विविध शर्यतींना प्रतिसाद मिळाला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्पर्धांचे उद्‍घाटन रवी पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, केवलसिंह रजपूत, संजय पाटील, माजी सरपंच सचिन चौगले, कुणाल शेलार, शहाजी व्हरगे, निवास चौगले आदींच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा: बैलगाडी शर्यत-रणजित शेलार व तुषार पाटील (वडणगे), सुजित कुर्णे (चिखली), सचिन टोपकर. सुट्टा एक्का- सरदार पुजारी (नागाव), अजित शिंदे. जनरल घोडागाडी- जिम्मी फॅन्स (कोगे), संदीप पाटील (पाडळी), संतोष पाटील (चिखली). नवतर घोडागाडी- शांतिनाथ निगडे, राजू बुचडे, पिंटू कोकरे. सुट्टा घोडा- नितीन माने (बावडा), उचगाव सोनी, अरबाज बोबडे. रिव्हर्स रिक्षा - अमीर मुल्ला, सचिन पाटील (बावडा), रिव्हर्स ट्रॅक्टर- संजय पाटील, राजेंद्र कांबळे, मछिंद्र दिंडे. म्हैस पळवणे- अनिकेत अतिग्रे, अशोक नंबर, विशाल पाटील. रेडकू पळवणे- संकेत शिंदे, अमित दिंडे, अमित इंगवले.
बक्षीस वितरणप्रसंगी डॉ. अजित पाटील, अजित माने, ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश ठाणेकर, जयवंत कुंभार, सनी जौंदाळ, विजय जाधव, विठ्ठल माने, पिराजी संकपाळ, रवी मोरे, नितीन नाईक, विवेक नांगरे, प्रवीण चौगले, भैया पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com