वडणगे   राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण 24 मार्चला होणार

वडणगे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण 24 मार्चला होणार

राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण उद्या

जिल्ह्यातील ४९७ शाळांमध्ये होणार सर्वेक्षण ः डाएटकडे जबाबदारी

सुनील स. पाटील
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २२ ः शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्थगित केलेले तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण आता उद्या (ता.२४) होणार आहे. राज्यातील ११ हजार ९३३ शाळांमधून एकाच वेळी हे सर्वेक्षण केले जाणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ४९७ शाळांचा यात समावेश असून, सुमारे दीड हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यावतीने हे सर्वेक्षण होणार असून, जिल्हास्तरावर याची जबाबदारी डाएटवर सोपविली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि अध्ययन संपादणूक क्षमता तपासली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद, महापालिका व खासगी अनुदानित शाळांपैकी ४९७ शाळांमधून एकाच वेळी हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मध्ये तिसरीच्या १५९, चवीच्या १६३ आणि आठवीच्या १७५ शाळांचा समावेश आहे. मराठी आणि गणित विषयांसाठीही बहुपर्यायी परीक्षा असणार आहे. यात इयत्ता तिसरी व पाचवीच्या वर्गासाठी मराठी भाषेचे २०, गणिताचे २५ असे ४५ प्रश्न असतील. यासाठी दीड तासाचा कालावधी आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे २५ व गणिताचे ३५ असे ६० प्रश्न असतील. ते सोडविण्यासाठी दोन तासांचा कालावधी आहे.
या परीक्षेसाठी तालुकास्तरावर १३ समन्वयकांची नेमणूक केली आहे. एटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता वैशाली पाटील व अधिव्याख्याता सरिता कुदळे या जिल्हास्तरीय समन्वयकाचे काम पाहणार आहेत.
...............
कोट....
यापूर्वी १७ मार्चला हे सर्वेक्षण होणार होते. मात्र, जुन्या पेन्शनच्या संपामुळे ते स्थगित केले होते. संप मिटल्याने आता हे सर्वेक्षण २४ मार्चला होणार असून, यातून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता किती आहे, अध्ययन स्थिती काय आहे हे तपासले जाणार आहे. डाएटने या सर्वेक्षणाची तयारी पूर्ण केली आहे. प्रश्नपत्रिकेसह गोपनीय साहित्य तालुकास्तरावर पाठविण्याले आहे.-
आय. सी. शेख, प्राचार्य डाएट
...............................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com