वाई किसन वीर कारखाना निकाल वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाई किसन वीर कारखाना निकाल वृत्त
वाई किसन वीर कारखाना निकाल वृत्त

वाई किसन वीर कारखाना निकाल वृत्त

sakal_logo
By

किसन वीर कारखान्यात
१९ वर्षांनंतर सत्तांतर
आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलला सर्व जागा
वाई, ता. ५ : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज १९ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व २१ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत कारखान्याची सत्ता काबीज केली. विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार, भाजपचे नेते मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शेतकरी विकास पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
कारखान्यासाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. कार्यक्षेत्रातील वाई, खंडाळा, जावळी, कोरेगाव, सातारा व महाबळेश्वर या सहा तालुक्यांतील एकूण १५४ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता. ३) ६९.३१ टक्के मतदान झाले. दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. चार अपक्षही रिंगणात होते. वाई औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.
पहिल्यापासून किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे उमेदवार साडेतीन ते चार हजार मतांनी आघाडीवर राहिले. त्यानंतर ऊसउत्पादक गटाची फेरी जाहीर करण्यात आली. दुपारी दोन वाजता दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू झाली. सायंकाळी साडेचार वाजता सोसायटी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. या वेळी आमदार मकरंद पाटील १४७ मतांनी विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर जल्लोष केला. त्यानंतर राखीव आणि ऊसउत्पादक गटाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत विद्यमान दहा संचालक पराभूत झाले, तर संचालक सचिन साळुंखे किसन वीर कारखाना बचाव पॅनेलमधून विजयी झाले. किसन वीर बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार ८ ते ९ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
चौकट
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते :
कवठे - खंडाळा गट क्र. १ : रामदास संपतराव गाढवे, खंडाळा (२२,१५५), नितीन लक्ष्मणराव जाधव-पाटील, बोपेगाव (२२,२४४), किरण राजाराम काळोखे, खानापूर (२१,७१६).
भुईंज गट क्र. २ : प्रकाश लक्ष्मण धुरगुडे, भिरडाचीवाडी (२१,६७९), रामदास महादेव इथापे, शिरगाव (२१,५६८), प्रमोद भानुदास शिंदे, जांब (२१,५०७).
वाई- बावधन- जावळी गट क्र. ३ : दिलीप आनंदराव पिसाळ, बावधन (२२,३५९), शशिकांत मदनराव पिसाळ, बावधन (२२,०५८), हिंदुराव आनंदराव तरडे, बामणोली तर्फ कुडाळ (२१,४६९).
सातारा गट क्र. ४ : संदीप प्रल्हाद चव्हाण (२२,११०), सचिन हंबीरराव जाधव (२२,०३६) बाबासाहेब शिवाजी कदम (२१,८३३).
कोरेगाव गट क्र. ५ : ललित जोतिराम मुळीक (२१,५६७), संजय अरविंद फाळके (२१,६७३), सचिन घनश्याम साळुंखे (२१,५३२).
महिला राखीव : सुशीला भगवानराव जाधव (२२,३९४), सरला श्रीकांत वीर (२१,५६२).
संस्था मतदारसंघ : मकरंद लक्ष्मणराव जाधव- पाटील (२३८)
अनुसूचित जाती जमाती राखीव : संजय निवृत्ती कांबळे (२२,७२४)
भटक्या/विमुक्त जमाती/विशेष मागास ः हणमंत बाबासाहेब चवरे (२२,६६१).
इतर मागास प्रवर्ग : शिवाजी बंडू जमदाडे (२२,६१०).

Web Title: Todays Latest Marathi News Wai22b01274 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top