
वारणा विज्ञान केंद्रामध्ये टाकाऊ पासून वैज्ञानिक खेळणी निर्माण करण्याची कार्यशाळा
02908
वारणानगर: येथे ''टाकाऊपासून वैज्ञानिक खेळणी'' या विषयावरील कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसोबत आमदार डॉ. विनय कोरे, अशोक रुपनर, डॉ. जॉन डिसोझा आदी.
''टाकाऊपासून वैज्ञानिक खेळणी''
कार्यशाळा वारणानगरला उत्साहात
वारणानगर, ता.३ : येथील वारणा विज्ञान केंद्र आयोजित ''टाकाऊपासून वैज्ञानिक खेळणी'' या विषयावरील दोन दिवसीय कृतिशील कार्यशाळेत विज्ञानचुंबकीय ऊर्जा, प्रकाश, ध्वनी या विषयांतील विविध संकल्पनांवर आधारित २५ हून अधिक प्रकारची वैज्ञानिक खेळणी विद्यार्थ्यांनी तयार केली.
विविध शाळांमधून ६० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभाग झाले. आईसर पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक रुपनर यांनी मार्गदर्शन केले.
वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे म्हणाले की, प्रत्यक्ष कृतीतून केलेल्या प्रयोगांमुळे विज्ञान आणि गणित सहज सोप्या पद्धतीने शिकता येत असून, ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. प्रशासकीय अधिकारी वासंती रासम, वारणा सायन्स सेंटरचे प्रिन्सिपल को-ऑर्डिनेटर डॉ. जॉन डिसोझा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेसाठी सायंटिफिक ऑफिसर प्रितेश लोले, विद्यासेवक आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रयत्न केले.
Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b01932 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..