
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी ऑलंपिक ची तयारी करावी- विनय कोरे वारणा समूहातर्फे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात सत्कार करणार
02948
वारणानगर: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा सत्कार करताना आमदार डॉ. विनय कोरे. शेजारी संदिप पाटील आदी.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील
यांनी ऑलंपिकची तयारी करावी
विनय कोरे; वारणा समूहातर्फे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात सत्कार करणार
वारणानगर, ता.२: वारणेशी अतुट नाते असलेल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी ऑलपिक स्पर्धेची तयारी करावी, यश निश्चित मिळेल असा विश्वास वारणा समूहाचे नेते आमदार डॉ विनय कोरे यांनी आज व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी पाटील यांनी आज दुपारी आमदार डॉ. विनय कोरे यांची संपर्क कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांचा कोरे यांनी सत्कार करुन शुभेछा दिल्या. आमदार कोरे म्हणाले, की अंतिम लढतीतील कुस्तीमध्ये दडपण न घेता खेळ केल्याने यश मिळाले यांचे मला कौतुक वाटते. पृथ्वीराज पाटील व पाटील कुटुंबीयांचे तात्यासाहेब कुस्ती केंद्र व कोरे परिवाराचे अनेक वर्षापासून अतुट नाते असल्याचे सांगत यावर्षी वारणेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात सत्काराचे नियोजन असल्याचेही आवर्जुन सांगितले.
वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे, सचिन कुसळे, जयदिप चव्हाण, उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील, बाबासो पाटील, मारुती पाटील यांच्यासह अनेक मल्ल उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b01951 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..