सुराज्य फौंडेशनच्या वतीने आय.ए.एस. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा ‘व्हिजन २०२२’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुराज्य फौंडेशनच्या वतीने आय.ए.एस. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा ‘व्हिजन २०२२’
सुराज्य फौंडेशनच्या वतीने आय.ए.एस. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा ‘व्हिजन २०२२’

सुराज्य फौंडेशनच्या वतीने आय.ए.एस. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा ‘व्हिजन २०२२’

sakal_logo
By

आयएएस परीक्षेतील यशवंतांचा
सुराज्य फाउंडेशनतर्फे आज गौरव

वारणानगर, ता.२० : येथील सुराज्य फाउंडेशनतर्फे यू.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रातील यशवंतांच्या ''व्हिजन २०२२'' गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवारी (ता.२३) येथील लालबहादूर शास्त्री भवन शेजारील खुल्या पटांगणात केल्याची माहिती अध्यक्ष एन.एच.पाटील यांनी दिली.
आमदार डॉ.विनय कोरे संस्थापित जनसुराज्यशक्तीची स्वयंसेवी संस्था सुराज्य फाउंडेशन गेली १२ वर्षे या सोहळ्याचे आयोजन करीत आहे.
२०२२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या यशवंतांची मनोगत ऐकण्यास मिळणार आहेत.
यशवंतांनी या गौरव सोहळ्यामध्ये प्रकट केलेल्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप देणेसाठी फौंडेशन प्रतिवर्षी हा सोहळा ‘व्हिजन’ डीव्हीडी व वारणा विश्व, वारणानगर या यूट्यूब चॅनेलवर याचे व्हिडिओ अपलोड केले करते. त्यांच्या मुलाखतींचा संग्रह ‘प्रवास एका ध्येयाचा….!’ यांची निर्मिती करीत आहे.
महाराष्ट्राचा देशाच्या प्रशासनातील सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हायस्कूल स्तरावर इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ''सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स’ आहे. यात सहभागी हायस्कूलमधील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. यशवंतांना कोल्हापुरी फेटा, खास स्मृतिचिन्ह देऊन वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते गौरव होईल. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे ''मी एक कार्यकर्ता'' हे आत्मकथन व तात्यासाहेबांच्या निवडक भाषणांचा संग्रह ''अमृततरंग'' हे ग्रंथ भेट दिली जाईल. तत्पूर्वी यशवंत वारणेतील संस्थाना भेट देतील, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b01993 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top