साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची वारणा साखर कारखान्यास सदिच्छा भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची वारणा साखर कारखान्यास सदिच्छा भेट
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची वारणा साखर कारखान्यास सदिच्छा भेट

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची वारणा साखर कारखान्यास सदिच्छा भेट

sakal_logo
By

03085

वारणा कारखान्यास
गायकवाड यांची भेट
वारणानगर, ता. १६ ः येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कारखान्यास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज सदिच्छा भेट दिली. कारखान्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेवून गत हंगामातील एफआरपी एकरकमी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आमदार डॉ. विनय कोरे यांच्याशी चर्चा केली. साखरेची योग्य वेळी विक्री करुन व्याजावरील होणारा खर्चही कमी केला आहे इत्यादी निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले. कार्यस्थळावर बूट तत्वावर चालू असणारा ४४ वॅट को-जनरेशन प्रकल्प नुकताच कारखाना मालकीचा झाल्याने कारखान्याच्या आर्थिक स्त्रोतामध्ये नक्कीच वाढ होणार असल्याचे स्पष्ट केले. एक्सपोर्ट साखर, रॉ शुगर, इथेनॉल उत्पादन तसेच कारखान्याकडे सध्या नोंद असलेल्या ऊस क्षेत्राची माहिती  खातेप्रमुखांकडून  घेतली.  तसेच सर्व कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन करुन केंद्रशासनाच्या धोरणाचा लाभ घेणेचे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार झाला. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त केले. संचालक उदयसिंह पाटील, किशोर पाटील, कार्यकारी संचालक  शहाजी भगत, सर्व खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b02019 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..