पिक पहाणी नोंदणी व ॲप या विषयावरील कार्यशाळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिक पहाणी नोंदणी व ॲप या विषयावरील कार्यशाळा संपन्न
पिक पहाणी नोंदणी व ॲप या विषयावरील कार्यशाळा संपन्न

पिक पहाणी नोंदणी व ॲप या विषयावरील कार्यशाळा संपन्न

sakal_logo
By

03107
वारणानगर : येथील वारणा महाविद्यालयात पीक नोंदणी व ॲप या विषयावर बोलताना नायब तहसीलदार असलम जमादार. शेजारी कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पवार, तलाठी किशोर पाटील आदी.

वारणा महाविद्यालयात
ई पीक नोंदणी कार्यशाळा

वारणानगर, ता. २५ : महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीने ई पीक पाहणी आणि नोंदणी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन पन्हाळा तालुक्याचे महसूल नायब तहसीलदार असलम जमादार यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात पन्हाळा तहसील महसूल विभागातर्फे ई पीक पाहणी नोंदणी व ॲप या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
जमादार म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या शेतीची पीक पाहणी आपण स्वतःच नोंदवायची असल्याने मोबाईलवर ॲप डाऊनलोड करावे. शेतातील पिकाचा फोटो अपलोड करून पीक पाहणी नोंद करून घ्यावी. शासकीय योजना, अनुदान व नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही नोंदणी फायद्याची ठरणार आहे. अडचण आल्यास तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.’ विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲपचे प्रशिक्षण तलाठी किशोर पाटील यांनी दिले.
कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पवार, तलाठी अनिल पोवार, जाखलेच्या तलाठी रोहिणी पाटील, प्रा. एस. के. आतिरकर, प्रा. जे. एस. शेटे, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b02030 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..