टु २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु २
टु २

टु २

sakal_logo
By

०३२१०
वारणानगर : येथे वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आमदार डॉ. विनय कोरे. शेजारी शुभलक्ष्मी कोरे, वैष्णवी कोरे-पाटणे, डॉ. पाटील व इतर.
-----

शोभाताई कोरे स्मृती पर्वकाळानिमित्त
वारणेत विविध कार्यक्रम
वारणानगर, ता. ९ : वारणा महिला उद्योगसमूहाच्या माजी अध्यक्षा (कै.) शोभाताई कोरे यांच्या स्मृती पर्वकाळानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केले. (कै) शोभाताई कोरे यांच्या जयंती ते पुण्यतिथीनिमित्त वारणा उद्योग व शिक्षण समूहातर्फे ‘दिव्य शोभाई स्मृती पर्वकाळ -२o२२ जागर स्त्री-शक्तीचा’ प्रदर्शनाचा प्रारंभ आमदार डॉ.कोरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रदर्शन बुधवार (ता.१२ ) पर्यंत सुरू राहील. आज विविध वस्तू प्रदर्शन व विक्रीचा प्रारंभ, उखाणे स्पर्धा झाल्या. सोमवारी (ता. १०) सकाळी ७ वी ते ९वी मुलींसाठी महिला सबलीकरण, प्रबोधनात्मक चित्र विषयांवर चित्रकला स्पर्धा, दुपारी ४ वा. पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होतील. मंगळवारी (ता. ११) सकाळी ५ वी ते ७ वी मुलींसाठी ''आकाशकंदील कार्यशाळा'', ''होम मिनीस्टर....खेळ पैठणीचा'' कार्यक्रम होईल. बुधवारी शोभाताई कोरे यांचा स्मृतिदिन असून सकाळी ९ वाजता शोभाताई कोरे यांच्या समाधीचे पूजन होईल. दुपारी बक्षीस समारंभ आणि ''वन शोभाश्री'' पुरस्कार, ''शोभाज्ञा कन्या गुणवत्ता शिष्यवृत्ती'' राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार वितरणाने सांगता होईल.
उद्‌घाटनप्रसंगी सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहाताई कोरे, वैष्णवी कोरे -पाटणे, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक शहाजी भगत, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ.प्रताप पाटील, बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, संचालक रवींद्र जाधव, अरुण पाटील, प्रदीप देशमुख, शिवाजी जंगम, डॉ.प्रताप पाटील, प्रकाश मोरे, सरपंच शिरीषकुमार जाधव, प्रा. के. जी. जाधव, दादासो बच्चे, विकास चौगुले, पदाधिकारी उपस्थित होते. प्रा.एन.आर.चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.