जालन्याच्या उद्योजिका सिताबाई मोहीते यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवनगौरव, निसर्गमित्र दिनकर चौगुले यांना वनशोभाश्री पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जालन्याच्या उद्योजिका सिताबाई मोहीते यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवनगौरव, निसर्गमित्र दिनकर चौगुले यांना वनशोभाश्री पुरस्काराने सन्मानित
जालन्याच्या उद्योजिका सिताबाई मोहीते यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवनगौरव, निसर्गमित्र दिनकर चौगुले यांना वनशोभाश्री पुरस्काराने सन्मानित

जालन्याच्या उद्योजिका सिताबाई मोहीते यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवनगौरव, निसर्गमित्र दिनकर चौगुले यांना वनशोभाश्री पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

03228
वारणानगर : सीताबाई मोहिते यांना शोभाताई कोरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना आमदार डॉ. विनय कोरे , शुभलक्ष्मी कोरे, स्नेहाताई कोरे, डॉ. अस्मिता कोलूर आदी.
-----
सीताबाई मोहिते यांना
शोभाताई कोरे जीवनगौरव

वारणानगर, ता. १२ : ‘पतीसमवेत ऊसतोडणी करणाऱ्या, यातूनच निरक्षर असतानाही भारतासह परदेशांत उद्योजिका म्हणून नावलौकिक मिळविलेल्या जालन्याच्या सीताबाई मोहिते यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. निसर्ग आणि पशू-पक्ष्यांचे अतुट नाते असलेले निसर्गमित्र दिनकर चौगुले या दोहोंचा जीवनपट प्रेरणादायी आहे. असे मत वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. शोभाताई कोरे स्मृतिदिनी वारणा उद्योग व शिक्षणसमूहातर्फे दिव्य शोभाई स्मृती सोहळ्याची सांगतेप्रसंगी ते बोलत होते.
उद्योजिका सीताबाई मोहिते यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय जीवनगौरव व पोर्ले (ता.पन्हाळा) येथील निसर्गमित्र दिनकर चौगुले यांना वनशोभाश्री पुरस्कार, गांधीनगरच्या केबीसी विजेत्या विजया चावला यांचा सन्मान आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. गुणवंत विद्यार्थ्यांना शोभाज्ञा कन्या गुणवत्ता शिष्यवृत्ती विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले.
मोहिते म्हणाल्या, ‘चाकरी करतानाच उभारलेल्या आवळ्याच्या उद्योगामुळेच महाराष्ट्र, गोव्यातील १०५ पुरस्कार मिळाले. पुरस्कार रकमेतून आवळा खिसचे यंत्र खरेदी करून वारणेतील महिलांना प्रशिक्षण देणार आहे. निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी, आईप्रमाणे निसर्गातील सजीव घटक आपल्यांशी बोलतात, असे सांगतानाच वानर, लांडोरी, वेल कशी बोलतात याची उदाहरणे दिली.
यावेळी सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहाताई कोरे, डॉ. अस्मीता कोलूर, दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम, मनिषा माने, नगराध्यक्ष रुपाली धडेल, सुलोचना देशमुख, प्रज्ञा पाटील, विजय वाणी, श्रुती कोरे, शरद महाजनसह संचालक, महिला उपस्थित होत्या. प्रा.नामदेव चोपडे यांनी आभार मानले.