डी. जी. काँलेज सातारा प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. जी. काँलेज सातारा प्रथम
डी. जी. काँलेज सातारा प्रथम

डी. जी. काँलेज सातारा प्रथम

sakal_logo
By

03243
वारणानगर : येथील महिलांच्या बास्केटबॉल स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कारप्रसंगी डॉ. वासंती रासम. सोबत प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर, अण्णासो पाटील आदी.
------------------


साताऱ्याचे डी. जी. महाविद्यालय प्रथम
आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा ; तीन जिल्ह्यातील १४ संघांचा सहभाग

वारणानगर, ता. १८ : येथे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शोभाताई कोरे शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिलांच्या बास्केटबॉल स्पर्धा चुरशीने आणि उत्साहात झाल्या. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १४ संघांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.‌ प्रकाश चिकुर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. आमदार डॉ. विनय कोरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्रीडासंचालक प्रा. आण्णासो पाटील, क्रांतीकुमार पाटील, निवड कमिटीचे अध्यक्ष प्रा. नंदू पाटील, सदस्य प्रा. आकाश बनसोडे, प्रा. भाऊसाहेब वडर व निरीक्षक म्हणून नीलेश पाटील उपस्थित होते. येथे दोन क्रीडांगणावर स्पर्धा झाल्या.
अंतिम सामना डी. जी. कॉलेज, सातारा विरुद्ध कन्या महाविद्यालय, मिरज यांच्यात चुरशीने झाला. यामध्ये डी. जी. कॉलेज, सातारा संघाने ५७-४८ गुणांनी विजयी प्राप्त केला. द्वितीय क्रमांक मिरज कन्या महाविद्यालयाने पटकाविला. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय व वायसीआयएस, सातारा यांच्यात लढत होऊन वारणा महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. आण्णासो पाटील, प्रा. क्रांतीकुमार पाटील, उदय जाधव, उदय पाटील, व रोहित घेवरी यांनी परिश्रम घेतले.