सेंसर युक्त वजन काट्यासह वारणा चा ६४ वा गळीत हंगाम प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंसर युक्त वजन काट्यासह वारणा चा ६४ वा  गळीत हंगाम प्रारंभ
सेंसर युक्त वजन काट्यासह वारणा चा ६४ वा गळीत हंगाम प्रारंभ

सेंसर युक्त वजन काट्यासह वारणा चा ६४ वा गळीत हंगाम प्रारंभ

sakal_logo
By

०३२७९
वारणानगर ः येथे हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत मोळी टाकून करताना आमदार डॉ. विनय कोरे, निपुण कोरे. शेजारी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, एच. आर. जाधव, व संचालक.
-----------
‘वारणा’चे १६ लाख टनाचे उद्दिष्ट
डॉ. विनय कोरे ; ६४ वा गळीत हंगाम प्रारंभ

वारणानगर, ता. २८ : एकाच वेळी बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉलींचे अचूक वजन होणारे सेन्सरयुक्त नवीन बसविलेले चार वजनकाटे, क्रेन, चेनवेल, रोलरसारख्या अंतर्गत प्रोसेसच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह ‘वारणा’चा ६४ वा गळीत हंगामाचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार डॉ. विनय कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपूण कोरे यांच्या हस्ते झाला.
डॉ. कोरे म्हणाले, ‘१६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने विकसित विस्तारित कार्यप्रणाली बसवल्याने ऊस उत्पादकांनी ऊस कारखान्यास पाठवावा.’ पाच गटांतील ऊस उत्पादक दगडू नलवडे (मोहरे), दिनकर चव्हाण-पाटील (तळसंदे), दिलीपकुमार शिराळे (नागांव), दत्तात्रय मुळीक (कुरळप), दादासाहेब चौगुले (मांगले) यांच्या व आमदार डॉ. कोरे, निपूण कोरे यांच्या हस्ते आणि संचालकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
सर्वप्रथम ऊस आणलेले ट्रॅक्टरमालक-चालक बाजीराव पाटील, आदिनाथ माने (दोघे भादोले), प्रशांत सावंत (सातवे), लक्ष्मण फडतरे (कातराळे) व बैलगाडीमालक बाबासाहेब भोसले (बहिरेवाडी) यांचा डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार झाला.
याप्रसंगी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील, उर्जांकुरचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, विशांत महापुरेंसह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी स्वागत केले. सचिव बी. बी. दोशिंगे यांनी आभार मानले. प्रा एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.
.....
चौकट
सभासदांना मान
सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला वारणा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षमतेचा बनला आहे. अध्यक्ष डॉ. कोरेंनी ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाचा प्रारंभ करुन वेगळेपण जोपासले.