वारणेची पहिली उचल ३,०२५ रुपये जाहीर - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणेची पहिली उचल ३,०२५ रुपये जाहीर -
वारणेची पहिली उचल ३,०२५ रुपये जाहीर -

वारणेची पहिली उचल ३,०२५ रुपये जाहीर -

sakal_logo
By

०३२८५
डॉ. विनय कोरे
----------------

वारणेची पहिली उचल ३,०२५

आमदार विनय कोरे; उर्वरित रक्कम हंगामाअखेरीस

वारणानगर,ता. १ : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३,०२५ रुपये देण्यात येईल. केंद्र शासनाच्या धोरणानुसार एफआरपीप्रमाणे होणारी उर्वरित रक्कम हंगाम बंद झाल्यानंतर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
वारणा साखर कारखान्याने ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांना नेहमी चांगला दर दिला असून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. नुकताच ४४ मेगावॅट को जनरेशन प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा झालेला असून ६० हजार लिटर क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पातून प्रतिदिनी १ लाख लिटर इथेनॉल निर्मिती, हंगामातील रिफायनरी प्रकल्पही चालू करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
चालू गळीत हंगामासाठी ‘वारणा’कडे ३३ हजार २४६ एकर ऊस क्षेत्राची नोंद आहे. ऊसाचे वेळेत गाळप होवून साखर उताराही चांगला राहण्याच्या दृष्टीने हंगाम वेळेवर सुरू केला. आतापर्यंत उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासून पिकवलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य केलेले आहे याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह संचालक मंडळाने आभार मानले. चालू गळीत हंगामातही पिकवलेला ऊस वारणा कारखान्यास पुरवठा करून गाळपाचे १६ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संचालक, कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी केले आहे.