अमृतनगर येथे साडेचार कोटींच्या पाणी टाकीचा आम.विनय कोरे यांच्या हस्ते भूमीपूजन - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतनगर येथे साडेचार कोटींच्या पाणी टाकीचा आम.विनय कोरे यांच्या हस्ते भूमीपूजन -
अमृतनगर येथे साडेचार कोटींच्या पाणी टाकीचा आम.विनय कोरे यांच्या हस्ते भूमीपूजन -

अमृतनगर येथे साडेचार कोटींच्या पाणी टाकीचा आम.विनय कोरे यांच्या हस्ते भूमीपूजन -

sakal_logo
By

03295
अमृतनगर : येथे पाणी टाकीचे उद्घाटन करताना आमदार डॉ. कोरे. शेजारी विशांत महापुरे, हंबीरराव पाटील व ग्रामस्थ.(छायाचित्र ः अक्षय डोंबे, अमृतनगर)
---
अमृतनगरला पाणी टाकीचे भूमिपूजन
साडेचार कोटी खर्च; आमदार विनय कोरे यांची उपस्थिती
-----
वारणानगर, ता. १० : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेच्या ४ कोटी ४० लाख रुपयांच्या पिण्याच्या पाणी टाकीचा भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला.
अमृतनगर येथे नव्यानेच ६५ हजार लिटर क्षमता असणारी पिणेचे पाणी टाकीची उभारणी करण्यात येणार असून टाकीमध्ये समाविष्ट असणाऱ्या अमृतनगर - धनलोभे कॉलनी, पाटील कॉलनी, बारामती मळा, भोईपाणंद भागातील रहिवाशांना कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे. कोडोली ग्रामपंचायतीमार्फत या भागात गटर, वीज, रस्ते कामे पूर्ण करून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी कोडोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशांत महापुरे यांच्या विशेष फंडातून योजना पूर्ण होत आहे.
यावेळी गोकूळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, विशांत महापुरे, कोडोलीच्या सरपंच गायत्री पाटील, निखील पाटील, रणजीत पाटील, नितीन कापरे, डॉ.प्रशांत जमणे,अविनाश महापूरे, हंबीरराव पाटील, विकास पाटील, संजय जाधव, अनिल चिवटे, अभिजीत पाटील, अक्षय डोंबे, ओमकार धनलोभे, सुभाष किल्लेदार, शिवराम पाटील, शितल शिंदे, विलास शेखर व ग्रामस्थ उपस्थित होते. युवराज पाटील यांनी आभार मानले.
---------