वारणाचे ५१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा - अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची माहीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणाचे ५१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा - अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची माहीती
वारणाचे ५१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा - अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची माहीती

वारणाचे ५१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा - अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची माहीती

sakal_logo
By

03332
डॉ. विनय कोरे
-----------

‘वारणा’चे ५१ कोटी
शेतकऱ्यांच्या खात्यावर

अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची माहिती

वारणानगर, ता. २३ : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील २१ दिवसांत गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे प्रतिटन ३०२५ रु. शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा केल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
वारणा कारखान्याचा ६६ वा गळीत हंगामाचा प्रारंभ २६ ऑक्टोबरला झाला. १५ नोव्हेंबरपर्यंत २१ दिवसांमध्ये १ लाख ६८ हजार टन उसाचे गाळप झाले. या काळातील एफआरपीप्रमाणे ३०२५ रु. एकरकमी पहिली उचल आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. एकूण ५१ कोटींची रक्कम बँक खात्यावर जमा झाली. वारणा कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी अत्याधुनिक वजनकाट्यासह ऊस गव्हाणी, क्रेन अशी यंत्रणा कार्यान्वित करून प्रतिदिन सरासरी ११ हजार टन उसाचे गाळप करून १६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या ११ हजारहून अधिक टन उसाचे गाळप सुरू असून आजअखेर २ लाख ५१ हजार टन गाळप झाले आहे, असे श्री. कोरे यांनी सांगितले.