विचार करा पक्का...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विचार करा पक्का...!
विचार करा पक्का...!

विचार करा पक्का...!

sakal_logo
By

विचार करा पक्का...!
वारणानगर, ता. १२ : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचाराला गती आली असून सोशल मिडियासह विविध यंत्रणेचा वापर सुरु आहे. मात्र वारणानगर परिसरात अशाच वेळी वाहनातून ध्वनीक्षेपकावरुन ताई, माई, अक्का असा आवाज येतो आणि कोणाच्या प्रचाराचे वाहन आले, म्हणून अबालवृध्दांचे लक्ष वेधते आणि ‘ताई, माई, अक्का भंगार देण्याचा विचार करा पक्का’ अशी आरोळी कानी पडताच सर्वत्र हास्यकल्लोळ उमटतो. यानेही हिच वेळ साधली का? अशीही चर्चा रंगते.