
वारणा परीसरातील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान
03398
वारणानगर : येथे पांडुरंग पाटील यांना कृषी तंत्रज्ञ पुरस्कार प्रदान करताना आमदार डॉ. कोरे. शेजारी अभय दप्तरदार आदी.
--------------
तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी कृषी महोत्सव
आमदार डॉ. कोरे; विविध पुरस्कारांचे वितरण
----------
----------
वारणानगर, ता. ११ : तात्यासाहेब कोरे यांनी वारणेत फोंड्या माळावर समृद्धी आणलीच; पण कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ७० गावच्या शेतकऱ्यांचा भक्कम पाया घातला. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वारणा कृषी महोत्सव आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले.
वारणा कृषी महोत्सवात सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कृषिभूषण पुरस्कार, सावित्रीअक्का कोरे कृषिलक्ष्मी पुरस्कार व स्व. विलासरावदादा कोरे कृषी तंत्रज्ञ पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते.
ऊसविकास अधिकारी सुभाष करडे यांनी स्वागत केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उपसंचालक अभय दप्तरदार म्हणाले, ‘बेरोजगारी कमी करायची असेल तर युवकांनी उद्योगांकडे वळावे.’ कीटकनाशकतज्ज्ञ पी. टी. पाटील म्हणाले, ‘पिकांवरील कीड कीटकनाशकाशिवाय नष्ट करता येते. नैसर्गिक उपायांचा उपयोग करावा.’
पुरस्कारप्राप्त असे ः स्व. विलासरावदादा कोरे कृषी तंत्रज्ञ पुरस्कार - पांडुरंग पाटील ( कुरळप). सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कृषिभूषण पुरस्कार - शैलेश कुलकर्णी (बच्चे सावर्डे), बाळासो चव्हाण (तळसंदे), शिवाजी पटकुरे (टोप), सर्जेराव पाटील (तांदूळवाडी), पांडुरंग खामकर (मांगले). स्व. सावित्रीअक्का कोरे कृषी लक्ष्मी पुरस्कार- आंबुताई कापसे (शहापूर), श्रीमती तोलाबाई भोसले (अंबप), कांता गुरव (खोची), गंगूबाई सावंत (कुंडलवाडी), प्रभावती गुरव (करंजवडे).
यावेळी वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, व्यवस्थापक आर. बी. कुंभार, संचालक, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, डॉ. आर. आर. सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगरे, विभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. शिंगे उपस्थित होते. प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन, प्रकाश मोरे यांनी आभार मानले.